spot_img
spot_img
Homeक्राइम🚨 सोयगाव पोलिसांची मोठी कारवाई!

🚨 सोयगाव पोलिसांची मोठी कारवाई!

🌿 विक्रीसाठी आणला जात असलेला १.९० किलो गांजा जप्त; सिल्लोड तालुक्यातील दोघे अटकेत 🚔 वेताळवाडी शिवारात सापळा रचून कारवाई; ₹१.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त

SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) 📍 सोयगाव तालुका | प्रतिनिधी :- अप्पा वाघ

अवैधरित्या विक्रीसाठी गांजा घेऊन येणाऱ्या दोघांना सोयगाव पोलिसांनी वेताळवाडी शिवारात रंगेहात पकडत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १ किलो ९०० ग्रॅम गांजा आणि मोटारसायकलसह एकूण ₹१ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथून हळदा मार्गे सोयगावकडे गांजा विक्रीसाठी आणला जात असल्याची गोपनीय माहिती सोयगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गुरुवारी (दि. २५) सायंकाळी सुमारे ५ वाजता वेताळवाडी शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी सापळा रचला.

यावेळी संशयित मोटारसायकल अडवून तपासणी केली असता अजगर अली अन्सार अली शहा (वय ४३, रा. उंडणगाव, ता. सिल्लोड) आणि पांडुरंग पुंडलिक केळोदे (वय ६५, रा. उंडणगाव, ता. सिल्लोड) यांच्या ताब्यातून १ किलो ९०० ग्रॅम गांजा आढळून आला.

💰 जप्त मुद्देमाल:

🌿 १ किलो ९०० ग्रॅम गांजा – अंदाजे किंमत ₹५७,०००
🏍️ मोटारसायकल – अंदाजे किंमत ₹५०,०००
💵 एकूण जप्त मुद्देमाल – ₹१,०७,०००

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

👮 विशेष पथकाची धडक कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या नेतृत्वाखाली गजानन दांडगे, अजय कोळी, कुणाल जाधव, सादिक तडवी, शांताराम सपकाळ यांच्या विशेष पथकाने केली.

घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित काईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

⚠️ सिल्लोड कनेक्शन पुन्हा चर्चेत

या कारवाईमुळे सिल्लोड तालुक्यातून सोयगाव परिसरात गांजाची तस्करी होत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी पहिल्याच काही दिवसांत सापळा रचून केलेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील काळात अशाच धडक मोहिमा सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
Jalgaon
moderate rain
23.3 ° C
23.3 °
23.3 °
94 %
6.4kmh
100 %
Wed
24 °
Thu
25 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
32 °

Most Popular

error: Content is protected !!