spot_img
spot_img
Homeचालू घडामोडी⚖️ विरवाडे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणी आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत...

⚖️ विरवाडे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणी आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप

SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी)  📍 अमळनेर प्रतिनिधी  | मुन्ना शेख : ✍️

अमळनेर जिल्हा सत्र न्यायालय यांनी चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावत मोठा आणि कठोर निर्णय दिला आहे.

या प्रकरणातील आरोपी अंकेश उर्फ अनिकेश पुण्या बारेला (वय २२) याला न्यायालयाने दोषी ठरवत भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत शिक्षा सुनावली.

😢 शेतात कामासाठी गेलेल्या मुलीवर अत्याचारानंतर निर्घृण हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील एका शेतमजुराने गावातील शेत निमबटाईने घेतले होते. ७ सप्टेंबर २०२४ रोजी त्याने आपल्या चार मुलींना निंदणीसाठी शेतात पाठवले होते.

दरम्यान आरोपी अंकेश बारेला हा पीडित मुलींच्या परिचयातील असल्याने तो त्या परिसरात ये-जा करत होता. सायंकाळी तीन मुली रडत घरी परतल्या आणि त्यांनी आरोपीने त्यांच्या बहिणीला जबरदस्तीने वाघ्या नाल्याकडे ओढून नेल्याची माहिती आई-वडिलांना दिली.

यानंतर कुटुंबीयांनी शोध घेतला असता कपाशीच्या शेतात पीडित मुलगी नग्न अवस्थेत गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. तिच्या डोक्यावर गंभीर मारहाण झाल्याचे दिसून आले. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड आणि रक्ताचे डाग आढळले होते.

🚔 दुसऱ्याच दिवशी आरोपीला अटक

चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ६५, ६६, १०१(३) तसेच पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपासात आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार करताना तिचा पाय मोडल्याचे तसेच तिला सुमारे १०० मीटरपर्यंत फरफटत नेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला ८ सप्टेंबर २०२४ रोजी अटक केली होती.

⚖️ डीएनए पुरावे आणि १४ साक्षीदारांवर आधारित कठोर शिक्षा

हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील ऍड. के. आर. बागुल यांनी न्यायालयात १४ साक्षीदार तपासले.

न्यायालयाने वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच घटनास्थळी मिळालेल्या रक्ताच्या नमुन्यांचे डीएनए अहवाल, कपडे, चप्पल आणि इतर वैज्ञानिक पुरावे ग्राह्य धरले.

न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांनी आरोपीला दोषी ठरवत नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

💰 पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई

न्यायालयाने आरोपीला पीडितेच्या वडिलांना ३० हजार रुपये देण्याचे आदेश दिले असून शासनानेही पीडित कुटुंबाला २५ हजार रुपयांची मदत द्यावी असे निर्देश दिले आहेत.

या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पीएसआय उदयसिंग साळुंखे, हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील, पुरुषोत्तम वालडे, राहुल रणधीर, सतीश भोई आणि भरत ईशी यांनी सहकार्य केले.

⚠️ समाजमन हादरवणाऱ्या घटनेवर कठोर न्याय

या अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येप्रकरणी न्यायालयाने दिलेला हा कठोर निकाल महिला व बालकांवरील गुन्ह्यांबाबत महत्त्वाचा संदेश मानला जात आहे.

RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
38.8 ° C
38.8 °
38.8 °
31 %
4.3kmh
0 %
Fri
42 °
Sat
41 °
Sun
40 °
Mon
40 °
Tue
40 °

Most Popular

error: Content is protected !!