spot_img
spot_img
Homeशहर✊🔥 भारत बंद आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

✊🔥 भारत बंद आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

भुसावळात धरणे आंदोलनात सहभागी होत दिले समर्थन पत्र 🇮🇳

SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) भुसावळ तालुका प्रतिनिधी : ✍️📍 | इम्रान खान

देशातील विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद, धरणे आंदोलन व निषेध मोर्चाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केला असून भुसावळ शहरातही या आंदोलनाला सक्रिय समर्थन देण्यात आले. ✊

Indian National Congress चे राष्ट्रीय अध्यक्ष Mallikarjun Kharge, लोकसभेचे विरोधी पक्षनेते Rahul Gandhi, यूपीए अध्यक्षा Sonia Gandhi, खासदार Priyanka Gandhi, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal तसेच जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा तथा बाळासाहेब पवार यांच्या आदेशानुसार देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

📢 एस.सी./एस.टी. असोसिएशनच्या धरणे आंदोलनात सहभाग

आज दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी एस.सी./एस.टी. असोसिएशनने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सक्रिय सहभाग नोंदविण्यात आला.
यावेळी डिव्हिजनल अध्यक्ष वाल्मिक भाऊ देहाडे, झोनल कार्याध्यक्ष सुधीर भाऊ जंजाळे, ज्येष्ठ नेते आर.सी. रावत, तायडे साहेब यांच्याकडे भुसावळ शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र निकम यांनी अधिकृत पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. 📄✍️

👥 पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

या प्रसंगी शहर सरचिटणीस संतोष साळवे, शहर उपाध्यक्ष अजगर शेख, शहर सरचिटणीस शैलेश भाऊ अहिरे, जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेश डोगरदिवे यांच्यासह विविध युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

⚖️ कामगारांच्या हक्कांसाठी लढा

नेत्यांनी आपल्या भाषणात कामगारांच्या हक्कांसाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त करत सरकारने कामगारविरोधी धोरणे मागे घ्यावीत, अशी मागणी केली. आंदोलन शांततापूर्ण व संघटित पद्धतीने पार पडले.
भुसावळ शहरात या आंदोलनामुळे राजकीय व कामगार वर्तुळात चर्चेला उधाण आले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 🔥✊

RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
38.5 ° C
38.5 °
38.5 °
27 %
7.7kmh
3 %
Sun
40 °
Mon
40 °
Tue
40 °
Wed
40 °
Thu
40 °

Most Popular

error: Content is protected !!