SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) 📍 सोयगाव प्रतिनिधी | अप्पा वाघ : ✍️
पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात इंधन बचतीची गरज अधोरेखित होत असताना पंतप्रधान Narendra Modi यांनी नागरिकांसह सर्व शासकीय यंत्रणांना इंधन आणि इतर खर्चात काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सोयगावात काही शासकीय अधिकारी व कर्मचारी या आवाहनाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर येत आहे. ⛽🚨
मिळालेल्या माहितीनुसार, सोयगावातील अनेक शासकीय अधिकारी हे सरकारी वाहनांचा वापर करून सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरांमधून नियमित ये-जा करत आहेत. त्यामुळे शासनाच्या इंधन बचतीच्या उद्दिष्टाला हरताळ फासला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. 🛣️
🚙 एका दिवसात वाहनांच्या दोन-दोन फेऱ्या?
काही अधिकारी तर सोयगावातून थेट छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी शासकीय वाहने बोलावून घेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एका दिवसात सरकारी वाहनांच्या दोन-दोन फेऱ्या होत असून, इंधन खर्चात मोठी वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे. ⛽💸
💰 वर्षाला कोट्यवधींचा इंधन खर्च
सोयगावातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये वर्षाकाठी तब्बल १ ते २ कोटी रुपयांपर्यंत इंधनावर खर्च होत असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय कार्यालयांतील चहापान खर्च, भाडेतत्त्वावरील वाहने आणि त्यांच्या देखभालीवरील लाखो रुपयांचा खर्च हा देखील चर्चेचा विषय बनला आहे. ☕🚘
🚨 “नागरिकांना काटकसर, पण अधिकारी मात्र मोकळे?”
सोयगावातील विविध विभागांकडे बोलेरो, कॉम्पॅक्टरसह जवळपास १० सरकारी वाहने असल्याचे समजते. काही विभागांनी ठेकेदारांकडून अतिरिक्त वाहनेही भाड्याने घेतली आहेत. विशेषतः आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र वाहनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याची चर्चा आहे.
एकीकडे सामान्य नागरिकांना इंधन बचतीचे धडे दिले जात असताना दुसरीकडे प्रशासनातील काही अधिकारी वाहन वापरात कोणतीही काटकसर करत नसल्याबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 🗣️⚖️
📄 जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश
दरम्यान, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून, त्यामध्ये पुढील महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत — 👇
✅ शासकीय वाहनांचा वापर केवळ अत्यावश्यक कामांसाठी करावा
✅ कमी अंतरासाठी सायकल किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा
✅ एकाच दिशेने जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रवास करावा
✅ वाहन अनावश्यक सुरू ठेवू नये
✅ कार्यालयातून बाहेर पडताना दिवे, पंखे, एसी, संगणक व प्रिंटर बंद ठेवावेत
👀 प्रशासन प्रत्यक्षात नियम पाळणार का?
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांनंतरही काही ठिकाणी सरकारी वाहनांचा वापर बिनधास्तपणे सुरू असल्याने “नियम फक्त कागदावरच का?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आगामी काळात प्रशासन यावर कठोर पावले उचलते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 🔍🚔
