spot_img
spot_img
Homeशहर⚠️ निसर्डी धरणात मासेमारी जीवावर बेतली! 🌊

⚠️ निसर्डी धरणात मासेमारी जीवावर बेतली! 🌊

🎣 जाळ्यात हात-पाय अडकलेल्या अवस्थेत ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला; अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) 📍 अमळनेर तालुका | प्रतिनिधी :- मुन्ना शेख

तालुक्यातील निसर्डी धरणावर मासेमारी करण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय इसमाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 🌊😔

मृत व्यक्तीचे नाव नामदेव दामू भिल (वय ५५, रा. खडके) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव भिल हे ३ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास निसर्डी धरणावर मासे पकडण्यासाठी जाळे टाकण्याच्या उद्देशाने गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत.

🔎 सकाळपासून भावाकडून शोधाशोध

नामदेव भिल हे रात्री घरी परत न आल्याने त्यांचा भाऊ संजय भिल यांनी त्यांचा शोध सुरू केला. धरण परिसरात सर्व बाजूंनी शोध घेतला असता धरणाच्या काठावर नामदेव यांचे कपडे आणि चपला आढळून आल्या.

त्यानंतर पाण्यात शोध घेतला असता नामदेव भिल यांचा मृतदेह पाण्यात पालथा तरंगताना दिसून आला. विशेष म्हणजे, त्यांच्या हात-पायांना मासेमारीचे जाळे अडकलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले.

🚔 पोलिसांना माहिती; अकस्मात मृत्यूची नोंद

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील जयदीप पाटील यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मयताचे भाऊ संजय भिल यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात खबर दिली.

या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

⚠️ धरण, तलाव किंवा नदीपात्रात मासेमारी करताना सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा जलसाठ्यांच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
69 %
6.8kmh
99 %
Fri
27 °
Sat
31 °
Sun
30 °
Mon
31 °
Tue
31 °

Most Popular

error: Content is protected !!