spot_img
spot_img
Homeचालू घडामोडी✨ सावदा पोलीस स्टेशनचे PSI अमोल गर्जे यांना “उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार”

✨ सावदा पोलीस स्टेशनचे PSI अमोल गर्जे यांना “उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार”

SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) 📍 सावदा प्रतिनिधी : ✍️ मुबारक तडवी

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सावदा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षक पीएसआय अमोल नारायण गर्जे यांना त्यांच्या उत्तम सेवा, कर्तव्यनिष्ठा व उत्कृष्ट कार्याबद्दल जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

हा गौरव सोहळा जळगाव परेड मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते पीएसआय अमोल गर्जे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

👮‍♂️ पीएसआय अमोल गर्जे यांनी सावदा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांशी सौजन्यपूर्ण वागणूक, गुन्हेगारी नियंत्रण तसेच सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत जिल्हा पोलीस दलाने त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान केला.

🎉 या सन्मानाबद्दल सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून पीएसआय अमोल गर्जे यांचे अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

✨ हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पावती असून, भविष्यातही जनतेच्या सेवेसाठी अशीच तत्परता कायम राहील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
37.9 ° C
37.9 °
37.9 °
13 %
2.3kmh
0 %
Fri
38 °
Sat
40 °
Sun
41 °
Mon
42 °
Tue
43 °

Most Popular

error: Content is protected !!