spot_img
spot_img
Homeशैक्षणिक✨ देशभक्तीचा उत्सव! एरंडोल शहरात प्रजासत्ताक दिन विविध सांस्कृतिक व शासकीय कार्यक्रमांनी...

✨ देशभक्तीचा उत्सव! एरंडोल शहरात प्रजासत्ताक दिन विविध सांस्कृतिक व शासकीय कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) एरंडोल तालुका प्रतिनिधी : ✍️ राजधर महाजन

एरंडोल शहरासह तालुक्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था व शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजवंदनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीपर गीत, नृत्य, कवायत व विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांनी परिसर देशभक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला.

🪔 काबरे विद्यालयात भव्य मुख्य कार्यक्रम

रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयाच्या पटांगणावर उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, आरएसपी विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले.

कार्यक्रमास आमदार अमोल पाटील, नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, तहसीलदार गोपाल पाटील, मुख्याधिकारी अमोल बागुल, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद काबरे, नगरसेवक डॉ. नरेंद्र पाटील, जगदीश ठाकूर, ईश्वर बि-हाडे, संभाजी पाटील यांच्यासह विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

🏛️ नगरपालिका कार्यालयात दुहेरी ध्वजवंदन

नगरपालिका कार्यालयात उपनगराध्यक्षा सुनीता माळी यांच्या हस्ते तर शंभर फूट ध्वजस्तंभावर नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
यावेळी मुख्याधिकारी अमोल बागुल, उपनगराध्यक्षा सुनीता माळी, प्रा. मनोज पाटील यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🏫 नांदखुर्द शाळेत विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक जल्लोष

नांदखुर्द (ता. एरंडोल) येथील जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा झाला. शाळेत प्रभाकर पाटील तर ग्रामपंचायतीत निवृत्त मेजर दिलीप पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांनी सुमारे दीड लाख रुपयांची देणगी जाहीर केली. ग्रामपंचायतीच्या वतीने शुद्ध पेयजल मशीनचे लोकार्पण करण्यात आले. माया फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

👴 सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघात ध्वजवंदन

सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघात सचिव विनायक कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. अध्यक्ष अरुण माळी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🏫 न्यू इंग्लिश व रा.ति. काबरे विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम

न्यू इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये संचालक अनिल बिर्ला यांच्या हस्ते तर रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयात सचिव राजीव मणियार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व नृत्य सादर केले.

⚓ संघवी आंतरराष्ट्रीय विद्यालयात नौदल जवानाच्या हस्ते ध्वजवंदन

उत्राण येथील संघवी आंतरराष्ट्रीय विद्यालयात नौदल जवान हेमराज बोरसे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’ या गीतावरील नृत्य विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांना स्वदेशी विमानवाहू नौका, राफेल, सुखोई, मिराज यांची माहिती देण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

🎒 गोपी गोल्ड इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये बक्षीस वितरण

गोपी गोल्ड इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये अ‍ॅड. मोहन शुक्ला यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. टाटा निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. चिमुकल्यांनी देशभक्तीपर नृत्य तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी संगीत कवायत सादर केली.

🇮🇳 एकूणच एरंडोल शहरात प्रजासत्ताक दिन हा उत्सव, देशभक्ती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला.

RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
29.6 ° C
29.6 °
29.6 °
22 %
5kmh
0 %
Mon
34 °
Tue
36 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
37 °

Most Popular

error: Content is protected !!