spot_img
spot_img
Homeशहर✨ प्रवाशांच्या सेवेस समर्पित ‘लाल परी’चा गौरव

✨ प्रवाशांच्या सेवेस समर्पित ‘लाल परी’चा गौरव

SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) ✍️ पाचोरा तालुका प्रतिनिधी : आबा सूर्यवंशी


अखिल भारतीय ग्राहक पंचायत व राज्य परिवहन महामंडळ, पाचोरा आगार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवासी दिन पाचोरा आगारात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रवाशांना तिळगुळ वाटून सुखद प्रवासाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच माहिती पुस्तिकांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिवहन समितीचे जिल्हाध्यक्ष आबा सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते.

🌞 कार्यक्रमात प्रांत सचिव डॉ. अनिल देशमुख यांनी रथसप्तमीचे महत्त्व विशद करत सांगितले की, या दिवशी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. सूर्य हा अखंड प्रवासी असून संपूर्ण विश्वाचा स्वामी आहे. म्हणूनच या देवतेला ग्राहक चळवळीचे आराध्य दैवत मानले जाते. “ग्राहक राजा” हा देखील अखंड प्रवासी असून तो दैनंदिन जीवनात सतत प्रवास करीत असतो.

“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य असून लाल परी ही जनसामान्यांची जीवनरेषा आहे. नागरिकांच्या सुख-दुःखाशी एसटीची नाळ जोडलेली असून प्रवाशांसाठी अधिक सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

🪔 कार्यक्रमाची सुरुवात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बिंदुमाधव जोशी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

🎤 प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिवहन समिती प्रमुख आबासाहेब लक्ष्मण सूर्यवंशी यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी हिताच्या योजनांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी पास सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी अर्ध्या तिकिटात प्रवास, दिव्यांगांसाठी सवलतीचे भाडे अशा विविध सामाजिक योजनांमुळे महामंडळाची संवेदनशील भूमिका अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

🚌 पाचोरा तालुका परिवहन समिती प्रमुख सुरेश तांबे यांनी प्रवाशांच्या अडचणींकडे लक्ष वेधत बसेस वेळेवर सोडणे, स्वच्छता राखणे, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे तसेच घोषित व विनंती थांब्यांवर सर्व बसेस थांबविण्याबाबत आदेशांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना मोठा लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

⚖️ जिल्हा न्याय व विधी समिती प्रमुख ॲड. स्वप्नील पाटील यांनी वाहतूक नियमांची माहिती देत सुरक्षित प्रवासाबाबत कायदेशीर मार्गदर्शन केले.

🌹 यावेळी बसस्थानक व बसेसमधील प्रवासी, चालक वाहक यांना गुलाबपुष्प व तिळगुळ देत मान्यवरांच्या हस्ते प्रवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

📋 कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर पाटील (जिल्हा सहसचिव) यांनी केले. संजय पाटील (तालुका अध्यक्ष) यांनी मान्यवरांचे स्वागत व सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन करण्यात आले.

🤝 कार्यक्रमास जिल्हा सहसचिव सुधाकर पाटील, तालुका अध्यक्ष संजय पाटील, सचिव ॲड. निलेश सूर्यवंशी, डेपो वाहतूक निरीक्षक प्रयास सोनी, अधीक्षक जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, सदस्य व मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते.

✨ हा कार्यक्रम प्रवासी हित, सामाजिक बांधिलकी व सार्वजनिक सेवाभाव यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरला.

RELATED ARTICLES
Jalgaon
broken clouds
28.6 ° C
28.6 °
28.6 °
44 %
3.9kmh
81 %
Sat
35 °
Sun
34 °
Mon
35 °
Tue
36 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!