spot_img
spot_img
Homeशहर⛽🚨 इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क!

⛽🚨 इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क!

⛽🚨 जिल्हाधिकाऱ्यांचा कडक निर्णय – गॅस साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी ‘विशेष भरारी पथके’ स्थापन ⛽🚨

SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) एरंडोल | प्रतिनिधी : राजधर महाजन

पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात इंधन व घरगुती गॅस टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य गॅस टंचाईच्या काळात साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संपूर्ण जिल्ह्यात ‘विशेष भरारी पथके’ स्थापन करण्याचे आदेश जारी केले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोणतीही गॅस टंचाई निर्माण होऊ नये तसेच घरगुती गॅस सिलिंडरची साठेबाजी होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने ही विशेष मोहीम सुरू केली आहे.

👮‍♂️ पथकाची रचना

प्रत्येक तालुक्यात या भरारी पथकाची रचना करण्यात आली असून त्यामध्ये –

अध्यक्ष : संबंधित तालुक्याचे तहसीलदार
सचिव : तालुक्याचे पुरवठा निरीक्षण अधिकारी
सदस्य : पोलीस निरीक्षक / उपनिरीक्षक, पुरवठा अधिकारी
समन्वय सदस्य : बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल कंपन्यांचे प्रतिनिधी व अधिकारी

🔍 पथकाच्या प्रमुख जबाबदाऱ्या

प्रशासनाने या पथकांना खालील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत –

1️⃣ गॅस एजन्सींच्या साठ्याची तपासणी करून ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळत असल्याची खात्री करणे.

2️⃣ घरगुती गॅसचा हॉटेल किंवा वाहनांमध्ये होणारा अवैध वापर रोखणे तसेच साठेबाजी करणाऱ्यांवर छापे टाकून कायदेशीर कारवाई करणे.

3️⃣ युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेत काळाबाजार किंवा अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवणे.

📢 नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, गॅस टंचाईची भीती न बाळगता प्रशासनाला सहकार्य करावे. कुठेही गॅस सिलिंडरचा काळाबाजार, अवैध साठेबाजी किंवा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा.

या निर्णयामुळे संभाव्य संकटाच्या काळात गॅस वितरण सुरळीत ठेवण्यास मदत होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही अडचण भासणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
Jalgaon
broken clouds
28.6 ° C
28.6 °
28.6 °
44 %
3.9kmh
81 %
Sat
35 °
Sun
34 °
Mon
35 °
Tue
36 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!