spot_img
spot_img
Homeशहरएरंडोल येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

एरंडोल येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी


SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) एरंडोल | तालुका प्रतिनिधी : राजधर महाजन


एरंडोल येथील क्रांतीसूर्य महात्मा फुले चौकात महात्मा फुले युवा क्रांती मंच व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य व सामाजिक समतेसाठी केलेल्या अमूल्य कार्याला उजाळा दिला. समाजातील अंधश्रद्धा, अन्याय व विषमता दूर करण्यासाठी फुले दांपत्याने केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. फुले दांपत्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग महिलांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारत सामाजिक संदेश दिला. उपस्थितांनी या कलात्मक रांगोळीचे विशेष कौतुक केले.


याप्रसंगी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन, सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, माजी नगरसेवक रुपेश माळी, नगरसेवक अनिल महाजन, मयूर महाजन, रवींद्र महाजन, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव, नगरसेविका कल्पना पाटील, छाया दाभाडे, कमलताई पाटील, सुनीता माळी, सत्यभामा पाटील, आरती महाजन, शारदा मराठे, भारती पाटील, जिजाबाई पाटील, शोभा साळी, नंदा शुक्ला, मीना मानुधने, शालिनी कोठावदे, गौरी मानुधने यांच्यासह महात्मा फुले युवा क्रांती मंचचे सदस्य व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडले असून सामाजिक प्रबोधनाचा संदेश या निमित्ताने सर्वत्र पोहोचल्याचे चित्र दिसून आले.

RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.8 ° C
26.8 °
26.8 °
46 %
1.9kmh
94 %
Sat
35 °
Sun
34 °
Mon
35 °
Tue
35 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!