spot_img
spot_img
Homeक्राइम🚨🔐 भुसावळ हादरलं! गॅस कटरने कपाट चिरून लाखोंचा ऐवज लंपास – भरवस्तीत...

🚨🔐 भुसावळ हादरलं! गॅस कटरने कपाट चिरून लाखोंचा ऐवज लंपास – भरवस्तीत चोरट्यांचा मोकाट सुळसुळाट! 🔥😱

SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) भुसावळ तालुका प्रतिनिधी : ✍️📍 इम्रान खान

भुसावळ शहरातील न सर्वांची फाईल परिसर, मटन मार्केट पाठीमागील भागात धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी अक्षरशः गॅस कटरच्या साह्याने कपाट फोडत रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यांवर हात साफ केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 🚨

माहितीनुसार, येथील रहिवासी जमीला रऊफ कुरेशी या दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या आईची प्रकृती बिघडल्यामुळे बडनेरा येथे गेल्या होत्या. आईची तब्येत गंभीर असल्याने त्या तेथेच थांबल्या होत्या. दरम्यान, त्यांनी गुरुवारी आपल्या मुलगी व जावयास घराची पाहणी करण्यास सांगितले.

🔎 पाहणीदरम्यान धक्कादायक प्रकार उघड

मुलगी व जावई घराची पाहणी करण्यासाठी गेले असता मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता घरातील दोन्ही खोल्यांचे कडी-कोंडे तुटलेल्या अवस्थेत आढळले. एका खोलीतील पेटी फोडलेली होती, तर दुसऱ्या खोलीतील कपाटांचे लॉक तोडण्यात आले होते. विशेष म्हणजे एका कपाटाचे लॉक अक्षरशः गॅस कटरच्या साह्याने कापण्यात आलेले दिसून आले. 🔥

घरातील लाकडी पलंग, बॅगा, पिशव्या, तिजोरी यामध्ये अस्ताव्यस्त शोधाशोध करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत होते.

💰 लाखोंचा ऐवज लंपास

या घरफोडीत अंदाजे ₹95,000 रोख रक्कम चोरीला गेली असून एका गल्ल्यातील रक्कम नेमकी किती होती हे सांगता येत नाही.
तसेच तब्बल पाऊण ते एक किलो चांदीचे दागिने – फुलजोडी, चैन, पट्ट्या, जोडवे, पायातील बेडी, अंगठ्या आदी विविध सिंगाराचे दागिने चोरीस गेले.याशिवाय अंदाजे तीन ते चार तोळे सोन्याचे दागिने – पान, आयरिंग, गळ्यातील चैन, चावलपोत, सातपत्ती मंगळसूत्र, मुख्य मंगळसूत्र (मणी पत्यांसह) असा मौल्यवान ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. 💎

🚪 दरवाज्याबाबत संशयास्पद बाब

घरातील कपाटाचा मुख्य दरवाजा गॅस कटरने तोडण्यात आला होता. तसेच कपाटालगतचा बाहेरील दरवाजा हा आतून कडी लावलेला असताना चोरट्यांनी तो गल्लीतून बाहेरून लावलेला आढळला.

“आम्ही दाराला आतूनच कडी लावतो, बाहेरून कधीच लावत नाही,” अशी माहिती जमीला कुरेशी यांनी दिली.

👮‍♂️ पोलिसांची पाहणी, तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. गुरुवारी दुपारी दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी येऊन प्राथमिक पाहणी करून गेले. त्यानंतर शुक्रवारी परत पोलीस कर्मचारी येऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

घराच्या बाजूला नाला असल्याने चोरटे नाल्याच्या कडेकडून येऊन घरफोडी केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

❓ आठ दिवसांत नेमकी चोरी कधी?

सदर घर बंद असल्याने तब्बल आठ दिवसांच्या कालावधीत नेमक्या कोणत्या दिवशी चोरी झाली, हा तपासाचा मोठा मुद्दा आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

भर वस्तीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरफोडी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भुसावळ शहरात चोरट्यांचा वाढता धुमाकूळ रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 🚨🔥

RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
22.1 ° C
22.1 °
22.1 °
36 %
3kmh
0 %
Mon
34 °
Tue
36 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
37 °

Most Popular

error: Content is protected !!